...आणि त्या मॅडम साठी ड्रायव्हर आता 'काका' झाले!

रात्री २ वाजता नेहमी सारखा आम्ही कंपनीततून कॅब मध्ये बसायला निघालो. रोज आम्हाला कॅब मधून सोडणारे आमच्या 'काकांच्या गाडीत' आज एक नवीन व्यक्ती आली होती. कंपनीत दिवसभर काय-काय घडलं यापासून ते काका कुठे कुठे गाडीत फिरले, याची चर्चा सुरूच होती. त्यात आम्हाला असं कळलं की ती नवीन व्यक्ती कंपनीत 'मॅनेजर' म्हणून काम करत आहे.

मॅडमचा घर जेव्हा जवळ आलं तेव्हा 'ड्राइवर हितना लेफ्ट घ्या' असं ती बोलली. आमची चर्चा शांत झाली आणि एकामेकांकडे बघायला लागलो. आजपर्यंत आमच्या गाडीत कधी कोणीही काकांना 'ड्राइवर' म्हणून हाक मारली नव्हती. मला वाईट वाटलं पण काकांच्या चेहऱ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

मॅडमची सोसायटी आली आणि ती उतरली. काका यू-तर्न घ्यायला लागले. सोसायटीच्या गेटला आत्मधून कडी लावलेली होती. मॅडम सोसायतीचं गेट वाजवायला लागली पण गार्ड झोपलेला असावा. रस्त्यावर पूर्ण अंधार होता, त्यामुळे मॅडम अस्वस्थ झाली. आम्ही आमच्या गप्पांमध्ये मग्न होतो. जेव्हा गाडी तिथून निघत असताना काकांनी हे पाहायला, तेव्हा त्यांनी गाडी मागे घेतली. २-३ दा होर्ण वाजवला आणि तिथेच गाडी थांबवली. काही वेळा नंतर गार्ड उठला आणि त्याने गेट उघडला. मॅडमच्या जीवात जीव आलं. आत जाताना 'थँक यू काका' असं बोलून गेली. गाडीत बसलेला प्रत्येक व्यक्तीला काकांच्या या कृत्याचा आनंद आणि अभिमान होता.

आपल्या अवती-भवती असलेला प्रत्येक व्यक्ती मन लावून दिलेलं काम करत आहे. गरज आहे, प्रत्येकाला एकच वागणूक द्यायची, प्रत्येकाच्या कामाला आदर द्यायची. अभाविप मध्ये काम करत असताना 'शेवटच्या माणसाला सन्मान मिळे पर्यंत आपल्याला काम करायचय' हे लक्ष प्रत्येक कार्यकर्ता आत्मसात करतो. गरज आहे आता या विचारला समाजाच्या प्रत्येक संवेदनशील नागरिक पर्यंत पोचवायची.

हे कसं करायचय हे नक्की नसेल,
पण हे करायचय हे नक्की आहे!

- आनंद पुरोहित

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Days as Student Activist - The Days I Remember Each Day

Remembering martyred ABVP Activist Krishnavardhan Reddy, who was murdered by Maoists at Osmania University

भीमगीत - भीमा तुज्या स्वप्नासाठी ABVP आली रं