होय ABVP आंबेडकरवादीच!

'सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी भारतीयच' या भीमाच्या वचनावर चालणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

1952 च्या निवडणुकीत 'मत बाद करा पण भीमाला मत देऊ नका' असं म्हणाऱ्या डाव्यांना उघडे पाडणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

भीमाने लिहिलेल्या संविधानला न मानणाऱ्या नक्षलवाद्यांना शिंगावर घेणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

1975 मध्ये भीमाने दिलेल्या अधिकारांवर आली गदा तेव्हा देशभर चळवळ उभी करणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

मराठवाड़ा विद्यापीठाचे नामांतर व्हावे यासाठी विधानसभेत घुसून आंदोलन करणारी, महाराष्ट्रभर रान पेटवणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

संविधानने स्थापन केलेल्या न्यायालयाला व गुन्हेगारांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला न मानणाऱ्या डाव्यांच्या विरोधात उभी ठाकणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजलच्या समर्थकांविरुद्ध JNU मध्ये लढणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

ना मनुस्मृती ना त्याची वृत्ती
फ़क्त भीमाने लिहिलेली भीमस्मृति म्हणजेच आपले संविधान मानणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

जातीमुक्तिचे भीमाचे स्वप्न जात न विचारणारे न मानणारे संघटन निर्माण करुन पूर्ण करणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

शेवटच्या माणसाला न्याय व सन्मान असे भीमाचे स्वप्न दिवस रात्र एक करुन साकारणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

तुमचं आमचं नात काय जय भीम - जय शिवराय असे म्हणत सर्वांना एका प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवणारी संघटना!
होय ABVP आंबेडकरवादीच!

संविधानाच्या शिल्पकाराचा त्रिवार जयजयकार!

जय भीम!

- आझाद आनंद

Comments

Popular posts from this blog

The Days as Student Activist - The Days I Remember Each Day

Remembering martyred ABVP Activist Krishnavardhan Reddy, who was murdered by Maoists at Osmania University

भीमगीत - भीमा तुज्या स्वप्नासाठी ABVP आली रं